वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत सोमवारी बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा ३ विकेट्सनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा नव्हता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र,तरी सुद्धा एका गोष्टीमुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज या सामन्यात मैदानात एकही चेंडू न खेळता बाद झाला. मैदानावर येऊन स्ट्राईक घेण्यास उशीर झाल्याने मॅथ्थूजला टाईम आऊट पद्धतीने बाद ठरवण्यात आलं.
दरम्यान, आपण शाकिब अल हसनमुळे बाद झाल्याच्या राग त्याच्या मनात कायम होता. त्यानंतर मॅथ्यूजने मैदानातच शाकिबचा बदला घेतला. यावेळी मॅथ्थूजने एक खास खूणही केली. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांग्लादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात अत्यंत खराब झाली.
त्यांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. दरम्यान, श्रीलंकेची धावसंख्या ४ बाद १३४ असताना मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात येण्यासाठी सज्ज होता. पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता. त्यामुळे त्याला स्ट्राईक घेण्यास वेळ लागला.
एवढंच कारण शाकिबसाठी पुरेसं ठरलं. मॅथ्यूजला टाइम आऊट पद्धतीने बाद होऊ शकतो, अशी अपील त्याने केली. पंचांनी नियम पाहिला आणि त्यांनी मॅथ्यूजला बाद करण्याचा निर्णय घेतला. मॅथ्यूज यावेळी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.
दरम्यान, बांग्लादेशचा संघ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. शाकिब फलंदाजीसाठी येताच श्रीलंकेच्या कर्णधाराने मॅथ्थूजकडे चेंडू सोपावला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी मॅथ्यूजने शाकिबला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. शाकिब बाद झाल्यानंतर मॅथ्यूजने एक खुण केली. या गोष्टीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मॅथ्यूज यावेळी टाइम आऊटमुळे बाद झाला त्यामुळे त्याने जेव्हा शकीबला बाद केले तेव्हा त्याने घड्याळाची खूण केली आणि टाइम दाखवला. या व्हिडीओवर क्रिडाप्रेमींनी देखील तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. जैसी करनी वैसी भरनी… असं म्हणत अनेकांनी शाकिबवर टीका केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.