Rahmanullah Gurbaz Saam (Social Media)
Sports

VIDEO : क्रिकेटर रहमानउल्ला गुरबाजनं फुटपाथवर झोपलेल्या लोकांची दिवाळी केली गोड; व्हिडिओ व्हायरल

Cricketer Rahmanullah Gurbaz : अफगाणिस्तानच्या संघाचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याच्या एका कृत्याने अनेकांची मने जिंकली आहेत.

Bharat Jadhav

Afghanistan cricketer Rahmanullah Gurbaz :

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेकांना चकित केलं आहे. अफगाणिस्तान किक्रेट जगात आपला दबदबा निर्माण केलाय. वर्ल्ड कप २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघाची चर्चा होतेय. याशिवाय अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची चर्चा अधिक होऊ लागलीय. गुरबाजचं कृत्य पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. (Latest News)

अहमदाबाद येथे रहमानउल्ला गुरबाज त्याच्या कारमधून जात होता. त्यावेळी त्याला निराधार आणि बेघर लोकं फुटपाथ झोपलेले दिसली. यानंतर गुरबाज आपल्या कारमधून बाहेर आला आणि दिवाळीनिमित्त सर्वांना भेटवस्तू देऊ लागला. गुरबाजने मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना पैसे देऊन मदत केली. गुरबाजने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या उशाशी ५००- ५०० नोटा ठेवत त्यांना दिवाळीची भेट दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निराधारांसाठी यापेक्षा चांगली दिवाळी भेट असू शकत नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गुरबाजच्या या कृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत. दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिलीय. त्यांनी ९ सामन्यात ४ विजय मिळवत पाईंट्स टेबलवर ६ वे स्थान काबिज केले.

यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्र ठरलाय. वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेश आणि भारताने अफगाणिस्तानचा पराभव केलाय. १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई पुणे फक्त ४८ मिनिटांत; अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Fridge Vastu Tips: फ्रिजवर चुकूनही या 5 वस्तू ठेवू नका, घरात वाढेल नकारात्मक उर्जा

Chunar Teri Sarke : वाईट शब्द, घाणेरडा डान्स; बॉलिवूडमधील १० अश्लील गाणी, ऐकून येईल चिड

SCROLL FOR NEXT