Rishabh Pant News, Latest Cricket News in Marathi
Rishabh Pant News, Latest Cricket News in Marathi  Saam TV
क्रीडा | IPL

Rishabh Pant: घड्याळाच्या नादात पंतने गमावले कोटी, क्रिकेटरनेच केली फसवणूक

Pravin

भारताच स्टार यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघाचा कर्णधार ऋषभ पंतची (Rishabh Pant) फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पण एक क्रिकेटर आहे. मृणांक सिंग (Mrinank Singh) असे या खेळाडूचे नाव आहे. ऋषभ कमी नाहीतर तब्बल दिड कोटींचा चूना लागला आहे. (Rishabh Pant News)

आरोपानुसार मृणांक सिंगने ऋषभ पंतला १ कोटी ६३ लाखांना गंडा घातला आहे. रिपोर्टनुसार मृणांक सिंगवरती पंतच्या मॅनेजरने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार ही कोट्यावधिंची फसवणूक मागिल वर्षी झाली होती.

मृणांक सिंगला महाराष्ट्रातील जुहू पोलिसांकडून याअगोदर अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ६ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप होता. ऋषभ पंत मृणांक सिंग कडून एक महागडे घड्याळ विकत घेणार होता, ज्यासाठी ऋषभ पंतने त्याला ३६ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिलेही होते. त्याचबरोबर एका दुसऱ्या घड्याळासाठी देखील पंतने त्याला ६२ लाख रुपये दिले होते. ऋषभ पंतने दिलेल्या तक्रारीत या सर्व घड्याळांची किंमत आहे.

ऋषभ पंत यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता. त्याला १६ कोटी रुपयांत संघाने रिटेन केले होते. दिल्लीचा संघ यंदा प्लेऑफमध्ये जाऊ शकला नाही. अगदी जवळ जावून संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT