Cricketer Death News x
Sports

Cricketer Death : कार अपघातात प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, किक्रेटविश्वावर शोककळा

Farid Hussain : कार अपघातामध्ये एका क्रिकेटपटूचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीवरुन जात असताना क्रिकेटपटूचा अपघात झाला होता. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • क्रिकेटपटू फरीद हुसेन यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • दुचाकीवरून जात असताना कारचे दार अचानक उघडल्याने झालेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.

  • त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वासह स्थानिक पातळीवरही शोककळा पसरली आहे.

Farid Hussain Death : क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. क्रिकेटपटू फरीद हुसेन यांचे निधन झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. फरीद हुसेन यांच्या निधनाच्या बातमीमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील क्रिकेटपटू फरीद हुसेन यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. २० ऑगस्ट रोजी फरीद हुसेन यांचा अपघात झाला होता. अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. हा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

फरीद हुसेन हे त्यांच्या दुचाकीवर प्रवास करत होते. रस्त्यावर जात असताना समोरच्या कारमधील एका व्यक्तीने अचानक कारचा दरवाजा उघडला. त्याचदरम्यान हुसेन हे कारजवळून जात होते. त्यांच्या दुचाकीची कारच्या दाराला टक्कर झाली. टक्कर झाल्याने ते लगेच जमिनीवर पडले. आसपासच्या लोकांनी त्यांची मदत केली. अपघातामध्ये फरीद हुसेन गंभीररित्या जखमी झाले होते. यात त्यांचा मृत्यू झाला.

फरीद हुसेन हे एक हुशार क्रिकेटपटू होते. त्यांच्या प्रदेशातील अनेक तरुण खेळाडूंसाठी ते प्रेरणास्थान होते. फरीद हुसेन यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधीही ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे कार अपघातात निधन झाले होते. भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतचाही कार अपघात झाला होता. अपघातात रिषभ थोडक्यात वाचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Late Night: दररोज रात्री उशीरा झोपण्याचे 'हे' नुकसान माहितीये का?

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर धावत्‍या कारने घेतला पेट

Hair Care: केस गळण्यामागे चुकीचा शॅम्पू तर जबाबदार नाही? जाणून घ्या योग्य शॅम्पू कोणता...

Ind Vs Pak: भारत–पाक सामना ठरला राजकीय रणांगण; संजय राऊत विरुद्ध अजित पवार आणि शिंदेसेनेची जुंपली

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात सूर्याच्या कृतीने वेधलं लक्ष, भारतीय खेळाडूंना दिला 'हा' संदेश, पाहा Video

SCROLL FOR NEXT