Robin smith death  Saam tv
Sports

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

Robin smith death : क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसलाय. माजी दिग्गज क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला आहे.

Vishal Gangurde

माजी क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचं वयाच्या 62 व्या वर्षी ऑस्ट्रेलियात निधन झालं.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 62 टेस्ट आणि 71 वनडे खेळल्या.

स्मिथ यांनी 1993 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 167* नाबाद धावा कुटल्या होत्या

एकीकडे अॅशेज सीरीज सुरू झाली आहे. दुसरीकडे या सीरीजचा दुसरा सामना ४ डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्याआधीच इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा माजी क्रिकेट रॉबिन स्मिथ यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

रॉबिन यांनी इंग्लंड संघाला मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी १९८० आणि ९० च्या दशकात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी आज मंगळवारी ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा श्वास घेतला.

स्मिथ यांनी १९८८ ते १९९६ सालादरम्यान ६२ सामने खेळले आहेत. १९९३ साली एजबेस्टनमध्ये स्मिथने ऑस्ट्रेलियाविरोधात एक दिवसीय सामान्यात १६७ धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्यांनी टेस्ट आणि वनडे सामन्यातही कमाल केली होती. ते गोलंदाजी चांगली करायचे. रॉबिन यांनी अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

ईसीबीचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी म्हटलं की, 'रॉबिन स्मिथ हे जलद गोलंदाजाचा आक्रमकपणे सामना करायचे. ते जलद गोलंदाजांना निर्भिडपणे सामोरे जायचे. त्यांनी त्यांच्या काळात इंग्लंडसाठी खेळताना चाहत्यांना कधीच नाराज केलं नाही. मैदानात उतरल्यानंतर आक्रमकपणे फटकेबाजी करायचे'.

रॉबिन यांनी १९८८ साली इंग्लंडसाठी वेस्ट इंडिजच्या विरोधात फर्स्ट क्लास डेब्यू केला होता. त्यांनी ६२ सामन्यात ४३.६७ सरासरीने ४,२३६ धावा कुटल्या. यात ९ शतक आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.

रॉबिन स्मिथ यांनी ७१ वनडे सामन्यात ३९.०१ सरासरीने २,४१९ धावा कुटल्या. त्यांनी वनडेमध्ये ४ शतक आणि १५ अर्धशतक ठोकले होते. इंग्लंडसाठी शेवटचा सामना हा श्रीलंकेविरोधात १९९६ साली खेळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Young Stroke Causes: तरुण वयात स्ट्रोक होण्याची कारणं कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : नंदुरबारमध्ये वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मतदारांची प्रचंड गर्दी

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

Maharashtra Live News Update: जिल्ह्यात राजकीय संस्कृती आहे आम्ही इतरवेळी खेळीमेळीतच असतो- नितेश राणे

SCROLL FOR NEXT