क्रिकेट सुपरस्टार रोहित शर्मा आणि रिषभ पंतला अलिबागची भुरळ... राजेश भोस्तेकर
Sports

क्रिकेट सुपरस्टार रोहित शर्मा आणि रिषभ पंतला अलिबागची भुरळ...

पर्यटनासाठी मित्रांसोबत मांडवा बंदरात दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - भारतीय क्रिकेट संघाचे सुपरस्टार क्रिकेटर रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनाही अलिबागच्या सौदर्याची भुरळ पडली आहे. भाऊचा धक्का येथून रोरो बोटसेवेने आज रविवारी सकाळी शर्मा आणि पंत हे आपल्या मित्रांसोबत मांडवा बंदरात दाखल झाले. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेक कलाकार, उद्योगपती यांच्यासह क्रिकेटर याचेही अलिबाग हे आवडते ठिकाण होऊ लागले आहे. रविवार विकेंडचा आनंद घेण्यासाठी रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे अलिबागमध्ये मौजमजा करण्यासाठी आले आहेत.

हे देखील पहा-

अलिबाग तालुका हा निसर्गाने आणि विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याने नटलेला आहे. त्यामुळे लाखो पर्यटक हे पर्यटनासाठी अलिबागेत दाखल होतात. क्रिकेट जगतातील देव मनाला जाणारा सचिन तेंडुलकर यांच्यासह अजित आगरकर हे दोघेही अलिबागकर झाले असून खारगल्ली येथे त्याचा बंगला आहे.

तर रवी शास्त्री याचा सुद्धा मांडवा येथे बंगला आहे. सिनेसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खान यांच्यासह दीपिका पदुकोण, रणवीर सिह, विराट कोहली व अनुष्का शर्मा याचेही फार्म हाऊस अलिबाग मध्ये आहेत. अलिबागची भुरळ आता रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनाही पडली असून भविष्यात ते सुद्धा अलिबागकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT