West Indies  Saam TV
Sports

World Cup 2023 : दोनदा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवानंतर नामुष्की

West Indies Out Of World Cup 2023 :  विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 विकेट राखून पराभव केला.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 विकेट राखून पराभव केला.

या पराभवानंतर वेस्ट इंडिजवर वर्ल्ड कपविश्वचषक स्पर्धेतून बाहेर होण्याची नामु्ष्की ओढवली आहे. वेस्ट इंडिज 48 वर्षांत प्रथमच 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.

सामन्यात काय झालं?

वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या विडींज संघ 43.5 षटकात केवळ 181 धावांवर ऑलआऊट झाला. यामध्ये होल्डरने 79 चेंडूंत 45 धावा केल्या, तर शेफर्डने 43 चेंडूंत 36 धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या स्कॉटलंडने हे आव्हान सहज पार केलं. (Latest sports updates in marathi)

एकेकाळी क्रिकेटवर वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज संघावर एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. विंडीजने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. याआधी विंडीजचा संघ टी-20 विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकला नव्हता.

पराभवाची कारणे काय?

फिल्डिंगमधील चुका, दुखापत आणि रणनितीतील उणिवा, होल्डरला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी, फलंदाजांचं खराब शॉट सिलेक्शन अशा अनेक कारणांमुळे वेस्ट इंडिजवर मोठ्या स्पर्धतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ३ संशयितांना जामीन मंजूर

Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

Farah Khan: 'अभिनेत्रीने नकार दिला म्हणून 'या' अभिनेत्याने मला किस केलं...'; फराह खानने केला धक्कादायक खुलासा

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, चांदीही महागली; तुमच्या भागात आजचा दर किती?

Sugar Free Sweet : दिवाळीला खास बनवा शुगर फ्री लाडू, मधुमेही रुग्णांसाठी उत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT