
PCB On World cup 2023: आयसीसी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार भारत - पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अजूनही पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची अनुमती दिलेली नाही. दरम्यान याबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात यावं लागणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा संघ भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानची सेक्युरिटी टीम भारतात पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी सामने होणार आहेत,त्या ठिकाणी सेक्युरिटी टीम पाठवणं हा प्रक्रियेचा एक भाग आहे.
पीसीबीच्या प्रवक्त्याने म्हटले की, 'आम्ही सामन्यांच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत. आम्ही पाकिस्तान सरकारच्या संपर्कात आहोत. पाकिस्तान सरकारकडून कुठलाही निर्णय आल्यानंतर आम्ही आयसीसीला कळवु.' पाकिस्तानचे सामने हे अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी रंगणार आहेत.
संघ करतात ठिकाणांची पाहणी..
वर्ल्ड कप ही आयसीसीची सर्वात मोठी स्पर्धा आहे. काही संघ, स्पर्धेपूर्वी सुरक्षा तपासणी करत असतात. यापुर्वी २०१६ मध्ये भारतात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. त्यावेळी, भारताचा धर्मशाळा येथे होणारा सामना हा कोलकाताला शिफ्ट करण्यात आला होता. (Latest sports updates in marathi)
असे आहेत पाकिस्तान संघाचे सामने..
६ ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हैदराबाद
१२ ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, हैदराबाद
15 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध भारत, अहमदाबाद
20 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू
23 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई
27 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई
21 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, कोलकाता
नोव्हेंबर ५ - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू
१२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, कोलकाता
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.