SRH Saam TV
Sports

IPL 2023 News: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का; मॅच विनर प्लेयर यंदाच्या सीजनमधून बाहेर

IPL 2023 News: सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 News: सनरायजर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हैदराबादचा मॅन विनिंग प्लेयर संघातून बाहेर झाला आहे. संघाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर संघातून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. यंदाच्या सीजनमध्ये यापुढे तो एकही सामना खेळू शकणार नाही.

वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित सामने खेळता येणार नाहीत. सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हैदराबाद फ्रॅन्चायजीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. तो लवकर फिट व्हावा हीच सदिच्छा. (Latest Marathi News)

यंदाच्या सीजनमधील सुंदरचं प्रदर्शन

वॉशिंग्टन सुंदरला आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यांमध्ये केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरने या आयपीएल 2023 हंगामातील 7 सामन्यांमध्ये एकूण 17.4 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 146 धावा दिल्या. यात त्याला केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत. फलंदाजीतही त्याला फार कमाल करता आलेली नाही. त्याने केवळ 60 धावा केल्या आहेत. (Sports News)

सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच् सामन्यात 3 विकेट घेतल्या होत्या. तर 15 चेंडूत 24 धावाही पटकावल्या होत्या. त्याने भारतासाठी 4 कसोटी सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत आणि 265 धावाही केल्या आहेत. तर 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 विकेट आणि 107 धावा तर 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 विकेट आणि 378 धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT