Roger Binny Can Be The Next Bcci President
Roger Binny Can Be The Next Bcci President  Saam TV
क्रीडा | IPL

Cricket News : वर्ल्डकप विजेता दिग्गज क्रिकेटर होणार BCCI चा नवा अध्यक्ष?, गांगुलीचे काय होणार?

Satish Daud-Patil

Cricket News : क्रिडा विश्वातून (Cricket) एक मोठी बातमी समोर येतेय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी लवकरच रॉजर बिन्नी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांचे वर्णी लागू शकते. (Cricket Marathi News)

गुरूवारी दिल्लीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते.

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा कार्यकाल संपला आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढील निवडणूक लढण्यासही नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष म्हणून आपला दावा मांडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सौरव गांगुली यांच्या जागी आता बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रॉजर बिन्नी हे 1983 सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली होती.

सध्या रॉजर बिन्नी हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) मध्ये पदाधिकारी म्हणून काम करत आहे. रॉजर बिन्नी यांच्याशिवाय दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे रोहन जेटली, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे संजय बेहरा, हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे अनिरुद्ध चौधरी यांच्या नावांची अन्य पदांसाठी चर्चा होत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT