IND vs SA : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी, पाहा प्लेईंग XI

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवणारा जाणार आहे.
IND vs SA 3rd ODI Match
IND vs SA 3rd ODI MatchSaam Tv

IND vs SA 3rd ODI Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवणारा जाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन सामने 1-1 असे बरोबरीत असल्याने या सामन्याला महत्व प्राप्त झालंय. भारतीय संघ (Team India) शेवटच्या सामन्यांत विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.

IND vs SA 3rd ODI Match
ऑस्ट्रेलियामध्ये भारताची कशी आहे कामगिरी? वाचा म्हणजे T-20 वर्ल्डकप कोण जिंकेल, हे कळेल

भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेला सुद्धा या सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. कारण 2023 साली होणार्‍या वन-डे विश्वचषकातील क्रमवारीवर या निकालाचा परिणाम होणार आहे. आफ्रिकेचा संघ वर्ल्डकप सुपर लीग पॉईंट टेबलमध्ये अकराव्या स्थानावर आहेत.

विशेष बाब म्हणजे श्रीलंका आणि आयर्लंडचा संघही आफ्रिका संघाच्या पुढे आहेत. पुढच्या जूनमध्ये विश्वचषकासाठी पात्रता फेरी होणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला पाच सामने खेळायला मिळणार आहेत. यातून त्यांना जर दहा गुण मिळवता आले तर आठव्या स्थानावर येऊन त्यांना वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळू शकतो.

टीम इंडियात होणार बदल ?

या मॅचमध्ये टीम इंडियात सातत्याने जागा मिळवू न शकणाऱ्या खेळाडूंची जबरदस्त कामगिरी केली. त्याच खेळाडूंच्या बळावर टीम इंडिया आता सीरीज जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दिल्लीत होणाऱ्या शेवटच्या वनडेसाठी टीम इंडियात काही बदल होणार ? हा प्रश्न आहे.

रवी बिश्नोई करणार पुनरागमन?

टीम इंडियाने मागच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमदला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली होती. खरंतर हा आश्चर्याचा धक्का होता. दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. टीमच्या विजयात योगदान दिलं. तिसऱ्या मॅचमध्येही दोघांना संधी मिळू शकते. कुलदीप यादव ऐवजी रवी बिश्नोईला संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग XI

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि मोहम्मद सिराज

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com