WC 2023, Ind vs Pak Match Saam TV
Sports

WC 2023, Ind vs Pak Match : भारत-पाकिस्तान सामना भारतात व्हावा हे अजिबात पटणारं नाही; मनसेचा विरोध BCCIचं टेन्शन वाढवणार

Cricket News : भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ODI World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. भारतात यंदाचा वर्ल्ड कप होत असल्याने पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण पाकिस्तानचा संघ भारतात येईल की नाही याबद्दल अजून काहीही स्पष्ट नाही.

पाकिस्तानी संघ भारतात येणार असल्याने मनसेनेही नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानी संघ भारतात येऊन क्रिकेट खेळणे हे अजिबात पटणारं नाही, असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. (Latest sports updates)

संदीप देशपांडे यांचं ट्वीट

भारत -पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे. हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही. यावर भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे? उबाठा यांना विचारत नाही आहे, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील क्रिकेट चाहते देखील हजेरी लावू शकतात.

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ९ सामने खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

SCROLL FOR NEXT