Ishan Kishan Saam TV
क्रीडा

Ishan Kishan: ईशान वादळाचा बसणार पंत- सॅमसनला फटका? पाहा शेवटच्या १० डावातील खेळीत 'कोण' ठरलं सरस

शिखर धवनसोबतच ईशान किशन, रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या नावाचाही सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो.

साम टिव्ही ब्युरो

Ishan Kishan : ईशान किशनच्या   (Ishan Kishan)   द्विशतकीय खेळीच्या जोरावर भारताने बांग्लादेशचा दणदणीत पराभव केला आहे. या वादळी खेळीने ईशानने आपणही लंबी रेस का घोडा असल्याचे सिद्ध केले आहे. ईशान किशनच्या या स्फोटक फलंदाजीने बांग्लादेशच्या गोलंदाजांची धुलाई तर केलीच त्यासोबतच रिषभ पंत आणि संजू सॅमसनचेही टेंशन चांगलेच वाढवले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ईशानची ही खेळी महत्वाची मानली जात आहे. मायदेशात होणाऱ्या या विश्वचषकासाठी निवड समिती सलामी फलंदाजीमध्ये मोठा बदल करु शकते. ज्यामध्ये ईशान किशन, रिषभ पंत आणि संजू सॅमसनच्या नावाची चर्चा आहे. मात्र या तिन्ही खेळाडूंच्या शेवटच्या १० डावांतील खेळी पाहता ईशान किशनचे पारडेच जड होताना दिसत आहे. (Sports News)

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे मात्र शिखर धवनची बॅट अद्याप शांतच आहे. त्यामुळेच शिखर धवनसोबतच ईशान किशन, रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या नावाचाही सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. मधल्या फळीत फलंदाजी करताना या तिन्हही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र कोणाचे पारडे जड होणार यासाठी त्यांच्या शेवटच्या १० धावांतील खेळी पाहूया.

यामध्ये तिघांनाही एकाचवेळी संधी मिळणे कठीण आहे. रिषभ पंतच्या फॉर्मचा विचार केल्यास त्याला अनेक सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये शेवटच्या १० सामन्यात त्याने २३.५ च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. रिषभ प्रमाणेच संजू सॅमसनच्या खेळीकडेही नजर टाकणे गरजेचे आहे. संजू सॅमसनने आपल्या १० खेळीत एकही शतक लगावले नाही मात्र २८४ धावा कुटल्या आहेत. त्यामुळे पंतप्रमाणेच संजू सॅमसनचीही कामगिरी प्रभावी नाही. मात्र पंतपेक्षा समाधानकारक नक्कीच आहे.

बांग्लादेश विरुद्ध वादळी द्विशतकीय खेळीनंतर या शर्यतीत ईशान किशनचे नाव आघाडीवर आहे. ईशानने शेवटच्या १० वनडे सामन्यात ४७७ धावा कुटल्या आहेत. या खेळीमध्ये एक द्विशतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र या खेळींमधील पाच डावात ईशानला २० चा आकडाही गाठता आला नाही. तरीही चमकदार कामगिरी करत त्याने विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT