Court  Saam Tv
Sports

Sports: अल्पवयीन खेळाडूवर अत्याचार; क्रिडा प्रशिक्षकास जन्मठेपेची शिक्षा

या निर्णायमुळे क्रीडा क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

जयेश गावंडे

अकोला : अल्पवयीन खेळाडूवर अत्याचार केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (court) शुद्धोधन सहदेव अंभोरे या क्रिडा (sports) प्रशिक्षकास लैंगिक शोषण करून मुलीस (girl) गर्भवती केल्याप्रकरणात दोषी ठरवून आजन्म कारावासाची व इतर कलमांमध्ये विविध शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच एकत्र तीन लाख दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (akola latest marathi news)

शुद्धोधन सहदेव अंभोरे हा क्रीडा प्रशिक्षक असताना तो अल्पवयीन मुलींसोबत शरीरसंबंध ठेवत असे. शरीर संबंधाला नकार देणार्‍या अल्पवयीन मुलीला संघात घेत नव्हता किंबहुना तिला संघातून काढून टाकेल अशी धमकीही देत असे अशा त्याच्याबाबत तक्रारी हाेत्या. त्याच्या या प्रकारामुळे एक अल्पवयीन खेळाडू त्याच्यापासून गर्भवती झाली होती. याप्रकरणी जुलै २०१८ मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. एमआयडीसी पोलिसांनी पिडीतेचा जबाब नोंदवून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय कोरचे यांनी यातील साक्षीदार व इतर पुरावे, डीएनए चाचणीचा अहवाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केला. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. डीएनए अहवालावरून शुद्धोधन अंभोरे याच्यावर गुन्हा सिद्ध झाला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंगला पांडे, सहायक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांनी शुद्धोधन सहदेव अंभोरे यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका मुलीचा विनयभंंग केल्याप्रकरणात कलम ३५४ मध्ये ५ वर्ष कारावासाची शिक्षा, कलम ५०६ मध्ये २ वर्ष शिक्षा ठोठावली. तसेच विविध कलमांतर्गत ३ लाख १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षेचे आदेश दिले. त्यासोबतच ३ लाख १० हजार रुपयांमधील अर्धी रक्कम ही पिडीतेला देण्याचे आदेशही बजाविले. या निर्णायमुळे क्रीडा क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT