Yuzvendra Chahal opened about divorce with Dhanashree saam tv
Sports

Yuzvendra Chahal: झोपायचो नाही, सारखे मनात आत्महत्येचे विचार...! घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलने सोडलं मौन

Yuzvendra Chahal opened about divorce with Dhanashree: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने घटस्फोटानंतरच्या कठीण काळाबद्दल मन मोकळे केले. चहलने सांगितले की, घटस्फोटानंतर त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता

Surabhi Jayashree Jagdish

  • युझवेंद्र चहल घटस्फोटामुळे मानसिक संघर्षाला सामोरा गेला.

  • घटस्फोट हा अचानक नव्हे तर दीर्घकाळाचा निर्णय होता.

  • चहल आणि धनश्री दोघेही करिअरमध्ये व्यस्त होते.

सध्या टीम इंडियापासून बाहेर असलेला स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल त्याच्या पर्सनल लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा घटस्फोट झाला होता. दरम्यान त्यावेळी त्याला मानसिकदृष्ट्या खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं. पहिल्यांदाच चहलने त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.

घटस्फोटाची प्रक्रिया अचानक नव्हती

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने सांगितलं की, धनश्रीशी झालेला घटस्फोट हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता, तर ही दीर्घकाळापासून चाललेली आणि वैयक्तिक पातळीवरची प्रोसेस होती. आमच्या दोघांमध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या होत्या. पण त्यांनी त्या सोशल मीडियापासून लपवून ठेवल्या होत्या. त्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य जनतेसमोर ‘नॉर्मल’ भासवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

चहल पुढे म्हणाला, "हे सगळं खूप आधीपासून सुरू होतं. आम्ही ठरवलं होतं की, हे लोकांना दाखवायचं नाही. आम्ही वाट पाहत होतो. आम्ही सोशल मीडियावर एक नॉर्मल कपल म्हणूनच वावरत होतो. मी खोटा अभिनय करत होतो, पण ते गरजेचं वाटत होतं."

दोघांचंही करिअर महत्त्वाचं होतं

चहलने स्पष्ट केलं की, तो आणि धनश्री दोघंही त्यांच्या-त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त होते आणि दोघांनाही काहीतरी सिद्ध करायचं होतं. एक नातं हे समजुतीवर चालतं. एक जण रागावलेला असेल तर दुसऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. दोन महत्त्वाकांक्षी व्यक्ती एकत्र राहू शकतात, पण प्रत्येकाचं एक स्वतंत्र आयुष्य आणि स्वतःचं ध्येय असतात.

मी कधीच फसवणूक केली नाही- चहल

चहल आणि धनश्री यांनी २०२० मध्यं लग्न केलं होतं. घटस्फोटाविषयी सविस्तर बोलताना तो म्हणाला, सोशल मीडियावर लोकांनी माझ्यावर फसवणूकीचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, "मी कधीच कोणालाही फसवलं नाही. मी अतिशय निष्ठावान व्यक्ती आहे. फक्त एखाद्या व्यक्तीबरोबर दिसल्यावर लोक लगेच अफवा पसरवतात. माझ्या दोन बहिणी आहेत. महिलांचा आदर कसा करायचा हे मला माहितीये.

“आत्महत्येचे विचारही डोक्यात यायचे”

मानसिक आरोग्याविषयीही चहलने बोलताना सांगितलं की, "संपूर्ण महिनाभर मी फक्त दोन तास झोपत होतो. आत्महत्येचे विचार मनात यायचे. मी हे सगळं माझ्या मित्रांसोबत शेअर केलं होतं. मला क्रिकेटमधून ब्रेकची गरज वाटत होती. अगदी जेव्हा मी मैदानावर असायचो, तेव्हाही माझं मन तिथे नसायचं."

युझवेंद्र चहलचा घटस्फोट कोणासोबत झाला?

युझवेंद्र चहलचा घटस्फोट कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनश्री वर्मासोबत झाला.

घटस्फोटाचा निर्णय अचानक घेतला गेला होता का?

नाही, चहलने सांगितले की घटस्फोट हा अचानक निर्णय नव्हता, तर दीर्घकाळापासून चाललेली प्रक्रिया होती.

चहलने सोशल मीडियावर कोणता आरोप फेटाळून लावला?

सोशल मीडियावर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला होता, ज्यावर त्याने स्पष्ट केले की त्याने कधीही कोणाला फसवले नाही.

घटस्फोटानंतर चहलला मानसिक आरोग्याच्या बाबतीत काय त्रास झाला?

चहलने सांगितले की, त्याला आत्महत्येचे विचार येऊ लागले होते आणि तो फक्त दोन तास झोपू शकत होता.

चहल आणि धनश्रीच्या नात्यातील मुख्य समस्या काय होती?

दोघेही त्यांच्या-त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त होते, त्यामुळे नात्यात समजूतदारी कमी झाली आणि त्यांच्या वैयक्तिक ध्येयांमध्ये फरक निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT