team india team india
Sports

IND vs NZ: आऊट असूनही अंपायरने नॉटआऊट दिलं; अंपायरच्या निर्णयावर Harmanpreet भडकली! नेमकं काय घडलं?

Harmanpreet Kaur News: भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये झालेल्या सामन्यात असं काही घडलं, ज्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली आहे.

Ankush Dhavre

Amellia Kerr Runout Controversy: भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामना पार पडला. भारतीय संघाचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर थेट अंपायरसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना १४ वे षटक टाकण्यासाठी दिप्ती शर्मा गोलंदाजीला आली. या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या अमेलिया केरने लाँग ऑफच्या दिशेने शॉट मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला आणि यष्टिरक्षक ऋचा घोषकडे फेकला. त्यावेळी ऋचाने डाईव्ह मारली आणि तिला धावबाद केलं. त्यावेळी भारतीय खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले. अमेलिया केरही माघारी जात होती. मात्र तेव्हाच अंपायरने तिला परत बोलवलं.

अंपायरने तिला परत बोलवल्यानंतर हरमनप्रीत कौरचा पारा चढला. यासह संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनाही नक्की काय झालंय हे समजलं नाही. त्यावेळी हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना प्रशिक्षक देखील अंपायरसोबत चर्चा करताना दिसून आले.

तर झाले असे की, ज्यावेळी हरमनप्रीत सिंगने थ्रो केला त्याआधीच अंपायरने ओव्हर समाप्तीची घोषणा केली होती. गोलंदाजानेही आपली कॅप अंपायरकडे दिली होती. त्यामुळे तिला बाद घोषित करण्यात आलं नाही.

अमेलिया केरला जीवदान मिळालं, पण ती फार काळ मैदानावर टिकू शकली नाही. १४ व्या षटकात धावबाद होताना बचावलेली अमेलिया केर २ चेंडूंनंतर म्हणजे १५ व्या षटकात बाद होऊन माघारी परतली. तिला या डावात २२ चेंडूत अवघ्या १३ धावा करता आल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT