कोला-कोला कंपनीच्या भारतातील स्वदेशी बेव्हरेज ब्रॅण्डला डिस्नी+ हॉटस्टारसोबत सहयोगाने नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम क्रिकेट अनुभव देणारी मोहिम 'थम्स अप फॅन पल्स'च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.
थम्स अप फॅन पल्स क्रिकेटचा आनंद घेण्याच्या नवीन युगाला सादर करत आहे, तसेच प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या उत्साहाला प्राधान्य देत आहे, तज्ञांच्या मतांसह अधिक चर्चेला आणि चाहत्यांच्या अद्वितीय सहभागाला प्रेरित करत आहे.
हा अद्वितीय उपक्रम थम्स अपच्या अस्सल उत्साहाशी संलग्न राहत क्रिकेट कन्टेन्ट लँडस्केपमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे. 'थम्स अप फॅन पल्स' हा प्लॅटफॉर्म असण्यासोबत चाहत्यांसाठी वैविध्यपूर्ण क्षेत्र देखील आहे, जेथे ते त्यांचे मत शेअर करू शकतात, तज्ञांसोबत परस्परसंवाद साधू शकतात आणि महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतील की 'भारत जिंकेल काॽ'. सिरीजमध्ये अव्वल तज्ञांचा समावेश आहे जसे सौरव गांगुली, युवराज सिंग, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, दिनेश कार्तिक. तसेच या सिरीजचे सूत्रसंचालन 'क्रिकेट समालोचक' हर्षा भोगले करणार आहेत. ते प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या उत्साहाला सादर करतील, तसेच आगामी विश्वचषकाच्या प्रत्येक पैलूबाबत अनोखी माहिती देतील.
डेटा, तंत्रज्ञान व सामाजिक अभिप्रायांना एकत्र करत थम्स अप क्रिकेटप्रेमींच्या सहभागामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. यामध्ये खेळाडू, भारतीय संघ व विश्वचषकाबाबत रोचक माहिती सांगण्यात येईल.
तसेच पॅक, डिजिटल व ओओएच अशा विविध माध्यमांच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वैयक्तिकृत कन्टेन्ट अनुभव देण्यात येईल आणि क्रिकेटप्रेमी देखील सहभाग घेण्यासह व्यासपीठावर त्यांचे मत शेअर करू शकतील.
'थम्स अप फॅन पल्स'चे लाँच आणि डिस्नी+ हॉटस्टारसोबतच्या सहयोगाबाबत आपले मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाचे स्पार्कलिंग फ्लेवर्सचे सीनियर कॅटेगरी डायरेक्टर टिश कोन्डेनो म्हणाले, ''आम्हाला सर्वोत्तम मोहिम 'थम्स अप फॅन पल्स'च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.
ही मोहिम प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या उत्साहाला सादर करते. डिस्नी+ हॉटस्टारसोबत सहयोगाने आमच्या अद्वितीय सिरीजसह आम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर क्रिकेट लीजेण्ड्सना एकत्र आणण्याने सन्माननीय वाटते. आमचा क्रिकेटप्रेमींसोबत सहयोग करत त्यांना एकत्र आणण्याचा आणि आगामी आयसीसी विश्वचषकासाठी उत्साह वाढवण्याचा मनसुबा आहे.''
डिस्नी स्टार येथील नेटवर्क - अॅड सेल्सचे प्रमुख अजित वर्घीसी म्हणाले, ''क्रिकेट रणनीतिक खेळ असला तरी त्यामध्ये हृदयस्पर्शी भावना सामावलेली आहे. एका षटकामध्ये मारले जाणाऱ्या षटकारांबाबत गणन असो किंवा शेवटच्या चेंडूवर षटकार लगावण्याची प्रार्थना केली जात असो त्यामधून अनेक मिश्र भावना दिसून येतात, ज्या खेळाला उत्तम बनवतात.
डिस्नी+ हॉटस्टारमध्ये आम्हाला थम्स अप पल्स सारखी अद्वितीय सिरीज क्यूरेट करण्यासाठी थम्स अपसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. यामधून सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, हर्षा भोगले आणि आगामी आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपसाठी इतर दिग्गज व्यक्ती अशा तज्ञांनी सादर केलेले तर्क व पॅशनसह क्रिकेटप्रती आपला राष्ट्रीय उत्साह दिसून येतो.''
थम्स अप फॅन पल्स डिस्नी+ हॉटस्टारसोबत एपिसोडिक सिरीज ते लहान स्वरूपाच्या कन्टेन्टपर्यंत विविध प्रकारच्या कन्टेन्ट फॉर्मेट्सचे मनोरंजन देते. आयसीसी विश्वचषकाबाबत सर्वसमावेशक संवादाला चालना देत ही मोहिम उत्साहाला नव्या उंचीवर नेते.
थम्स अप क्रिकेट संवादाला चालना देण्याप्रती, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना एकत्र आणण्याप्रती कटिबद्ध आहे. थम्स अप फॅन पल्सचा भाग बनण्यासाठी ग्राहकांना थम्स अप खरेदी करून पॅकवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि त्यांचे मत व्यक्त करावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.