chris woakes  twitter
Sports

Chris Woakes Catch Controversy: ख्रिस वोक्सने पकडला जगात भारी कॅच; मात्र अंपायरने नॉटआऊट देताच पेटला नवा वाद- VIDEO

PAK vs ENG, 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत ख्रिस वोक्सने कॅच पकडला, मात्र अंपायरने त्याला नॉटआऊट घोषित केलं.

Ankush Dhavre

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. मुल्तानच्या मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील अशी काही घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना, ११७ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलमानने जॅक लीच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू उंच हवेत, मिड ऑफ बाऊंड्रीच्या दिशेने गेला. त्यावेळी ख्रिस वोक्स बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षअण करत होता. ख्रिस वोक्सने शानदार झेल घेतला, मात्र अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं.

तर झाले असे की, बाऊंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ख्रिस वोक्सने हवेत उडी मारत झेल घेतला. मात्र त्यावेळी त्याला जावणलं की, त्याच्या पाय बाऊंड्रीलाईनच्या बाहेर जाणार आहे. त्यावेळी त्याने चेंडू मैदानाच्या आत फेकला आणि तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर लगेच तो मैदानाच्या आत आला आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पूर्ण केला. हा झेल पकडताच ख्रिस वोक्स जल्लोष करताना दिसून आला. यासह इंग्लंडचे खेळाडूही जल्लोष करताना दिसून आले.

अंपायरने काय निर्णय दिला ?

हा निर्णय अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. तिसऱ्या अंपायरने हा निर्णय देण्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर अंपायरला वाटलं की, हा झेल योग्यरित्या घेतला गेलेला नाही. त्यामुळे अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. मात्र या निर्णयानंतर वाद पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. काहींचं म्हणणं आहे की, अंपायरने चुकीचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT