cheteshwar pujara and shubman gill wicket twitter
Sports

WATCH WTC Final 2023: एकाच चेंडूवर पडली गिल- पुजाराची विकेट; पाहा VIDEO

Shubhman Gill And Cheteshwar Pujara Wicket: शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा एक सारख्याच चेंडूवर बाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला आहे.

प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पहिल्या डावात भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा एक सारख्याच चेंडूवर बाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

गुरुवारी( ८ जून) ऑस्ट्रेलिया संघाचा डाव ४६९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील सलामी जोडी कडून चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्मा अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ शुभमन गिलने देखील १३ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली.

गिल - पुजारा एकसारख्या चेंडूवर बाद...

शुभमन गिलने नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. या डावात देखील तो मोठी खेळी करेल असं वाटलं होतं.

मात्र तो अवघ्या १३ धावांवर माघारी परतला. तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाकडून ७ वे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलेंड गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडून आत आला, जो शुभमन गिलला कळालाच नाही. हा चेंडू त्याची दांडी उडवून गेला. (Latest sports updates)

तर काउंटी क्रिकेट गाजवणारा चेतेश्वर पुजारा देखील या डावात फ्लॉप ठरला. १४ वे षटक टाकण्यासाठी कॅमेरून ग्रीन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू पुजाराने हुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला या चेंडूचा अंदाज आला नाही. चेंडू टप्पा पडून आत आला आणि पुजाराची दांडी गुल करून गेला. पुजाराने या डावात अवघ्या १४ धावा केल्या. भारतीय संघाला पहिल्या डावात २९६ धावा करता आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT