WTC Final 2023: टीम इंडियाला जिंकायचं असेल तर मोडावा लागेल १२१ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा रेकॉर्ड

IND VS AUS WTC FINAL: भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर १२१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढावा लागणार आहे.
team india
team india saam tv
Published On

IND VS AUS WTC FINAL 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ गडी बाद १२३ धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड मजबूत करत २९६ धावांची आघाडी घेतली आहे.

त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. आता भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर १२१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढावा लागणार आहे.

team india
Marnus Labuschagne Viral Video: अरे उठ भावा! गाढ झोपेत असलेल्या लाबुशेनची वॉर्नरने खरोखर झोप उडवली; पाहा मजेशीर VIDEO

भारतीय संघाला मोडावा लागणार १२१ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या मैदानावरील जर रेकॉर्ड पाहिला तर, धावांचा पाठलाग करताना केवळ २६३ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे.

हा पाठलाग १२१ वर्षांपूर्वी केला गेला होता. त्यावेळी इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर १ गडी राखून विजय मिळवला होता.

हा रेकॉर्ड आजवर कुठल्याच संघाला मोडता आला नाही. जर भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर हा रेकॉर्ड मोडून काढावा लागणार आहे. १२१ वर्षांमध्ये खेळपट्टीत देखील बदल झाला आहे. जर या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलची बॅट तळपली. तर नक्कीच भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो. (Latest sports updates)

team india
WTC Final Viral Video: शाब्बास, खेळत रहा! रहाणे- शार्दुलची इंग्लडच्या मैदानावर 'मराठी'तून रणनिती; हटके संवादाचा व्हिडिओ व्हायरल

ओव्हलच्या मैदानावर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले टार्गेट...

२६३/९- इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर १ गडी राखून मिळवला विजय.

२५५/२- वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ८ गडी राखून मिळवला विजय.

२४२/५- ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ५ गडी राखून मिळवला विजय

२२६/२- वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ८ गडी राखून मिळवला विजय

team india
Ricky Ponting On WTC Final: 'इथून भारतीय संघाचं अंतिम सामना जिंकणं कठीण..'दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव..

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com