Praggnanandhaa  saam tv
Sports

Chess World Cup 2023 : जगज्जेता बनण्याचं स्वप्न हुकलं! अंतिम सामन्यात कार्लसनकडून १८ वर्षीय प्रज्ञानंदचा पराभव

Praggnanandhaa vs carlsen Final Result: जागतिक बुध्दिबळ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला

Ankush Dhavre

Chess World Cup 2023 Praggnanandhaa vs carlsen Final :

जागतिक बुध्दिबळ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन आणि भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे आमने सामने होते.

या सामन्यात प्रज्ञानंदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. प्रज्ञानंद हा जागतिक बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता होण्याचा मान पटकावणारा सर्वात युवा बुध्दिबळपटू ठरला आहे.

हे दोघे खेळाडू मंगळवारी अंतिम सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. या सामन्यात प्रज्ञानंद सफेद तर कार्लसन काळ्या रंगाच्याा सोंगट्यांसह खेळत होते.कार्लसनने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रज्ञानंदने रक्षात्मक खेळ करत हा सामना वाचवला. शेवटी दोन्ही खेळाडूंनी हात मिळवण्याचा निर्णय घेतला आणि हा सामना ड्रॉवर समाप्त झाला होता.(Latest sports updates)

बुधवारी देखील हे दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. या सामन्यात कार्लसन सफेद तर प्रज्ञानंद काळ्या रंगाच्या सोंगट्यांसह खेळत होते. या सामन्याची ज्याप्रकारे सुरुवात झाली त्यावरून असं वाटत होतं की,हा सामना ड्रॉवर समाप्त होणार आणि शेवटी हेच झालं. आता टाय ब्रेकर सामन्यात मॅग्नस कार्लसनने प्रज्ञानंदला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT