KKR VS CSK Match Result Saam tv
क्रीडा

KKR VS CSK Match Result: चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाताचे फलंदाज ढेपाळले; धोनी सेनेचा 'रॉयल' विजय

Vishal Gangurde

KKR VS CSK Match Result: कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान ईडन गार्डनमध्ये यंदाच्या हंगामाचा ३३ वा सामना पार पडला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी झुंजार खेळी करत कोलकाताला संघाला विजयासाठी 236 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या फलंदाजाची चांगलीच पडझड पाहायला मिळाली. चेन्नईने ४९ धावांनी सामना जिंकला. (Latest Marathi News)

कोलकाताची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. कोलकाताला पहिल्याच षटकात सुनिल नरेनच्या रुपाने धक्का बसला. आकाश सिंहने त्याला बाद केले. सुनिल बाद झाल्याने संघाची धावगतीला ब्रेक लागला.

कोलकाताने चार षचटकाच्या आतच दोन गडी गमावले. कोलकाताने ६ षटकात २ गडी गमावून ३८ धावा कुटल्या होत्या. व्यंकटेश अय्यर देखील स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार नितीश राणा २० चेंडूत २७ धावा करत माघारी परतला.

कोलकाताच्या जेसन आणि रिंकुने संघाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेसन ६१ धावा कुटल्यानंतर तंबूत परतला. कोलकाता संघ २० षटकात ८ गडी गमावून १८६ धावा केल्या.

चेन्नईच्या फलंदाजांची झुंजार खेळी

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडने जोरदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर ऋतुराज ३५ धावा करत माघारी परतला.

ऋतुराजच्या विकेटमुळे चेन्नईला पहिला धक्का बसला. तर कॉन्वे त्याचा आवडीचा शॉट मारताना बाद झाला. कॉन्वेने ४० चेंडूत ५६ धावा कुटल्या. ५६ धावा कुटताना कॉन्वेने ४ चौके आणि ३ षटकार लगावले.

दोघे बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवमने संघाची कमान सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ८५ धावा कुटल्या. पुढे रहाणेने २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर शिवम दुबेने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शिवम दुबे अर्धशतक ठोकल्यानंतर तंबूत परतला. दुबेने धावा करताना दोन चौके आणि पाच षटकार लगावले.

अजिंक्य रहाणेचा कोलकाताच्या विरोधात खेळताना आक्रमक अवतार पाहायला मिळाला. रहाणेने चक्रवर्तीच्या षटकात २ पाठोपाठ षटकार लगावले. चेन्नईने १९ षटकात ३ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. चेन्नईने २० षटकात ४ गमावून २३५ धावा केल्या होत्या.

चेन्नईची विजयानंतर पॉंइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर उडी

चेन्नई यंदाच्या आयपीएल हंगामात आजच्या विजयाने हॅट्रिक विजय प्राप्त केला आहे. आजच्या विजयाने चेन्नईने पाँईट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नईने १० गुण मिळवत पाँईट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पक्क केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT