क्रीडा

CSK vs PBKS: चेन्नईत CSKच्या धावसंख्येची 'स्लो चेन्नई एक्स्प्रेस'; पंजाबसमोर माफक १६३ धावांचं आव्हान

Bharat Jadhav

Chennai Super Kings vs Punjab Kings : आयपीएल २०२४ चा ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्स मध्ये होत आहे. या दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आमनेसामने आलेत. पंजाब संघाचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सॅमचा हा निर्णय काहीसा योग्य ठरला. पंजाबच्या गोलंदाजांनी सीएसकेची धावसंख्या रोखून ठेवली. सीएसकेने २० षटकात ७ विकेट गमावत १६२ धावा केल्या. आता पंजाबला विजयासाठी १६३ धावा कराव्या लागतील.

पंजाबने फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर चेन्नईचा संघ २०० पार जाणार असल्याचं वाटत होतं, परंतु पंजाबच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत सीएसकेला १६२ धावांमध्ये रोखलं. कर्णधार ऋतुराजशिवाय कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सीएसकेकडून फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडू ६२ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेने २९ धावा केल्या. गायकवाडला अर्शदीप सिंगने बाद केले. पंजाबकडून गोलंदाजी करताना हरप्रीत ब्रार आणि राहुल चहरने २-२ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंगने १-१ विकेट घेतली. सीएसकेकडून सलामीला ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे आले होते.

दोघांनी चांगली सुरूवात केली परंतु पंजाबच्या गोलंदाजांनी २९ धावांवर असललेल्या अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. हरप्रीत बरारने रहाणेला बाद केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवम दुबेलाही बरारने खातं न उघडू देता तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेला रविंद्र जडेजाला देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

चेन्नईचा हा मोसमातील १०वा सामना असून यात सीएसकेने आतापर्यंत ९ सामन्यांत १० पॉईंट्स मिळवलेत. चेन्नईला ५ विजय आणि ४ पराभव पत्करावे लागलेत. पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके चौथ्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्सच्या खात्यात फक्त ६ पॉईंट्स आहेत. पंजाबने ९ सामन्यात केवळ ३ विजय मिळालेत. पंजाबला ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

पंजाब किंग्स : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्स : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT