CSK vs LSG IPL 2024: 
क्रीडा

CSK vs LSG: जे धोनीला नाही जमलं ते ऋतुराजनं केलं; शतक ठोकत लखनऊला दिलं २११ धावांचं आव्हान

CSK vs LSG IPL 2024: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलचा ३९ वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनऊ सुपर जाएंट्समध्ये सामना होत आहे.

Bharat Jadhav

Chennai Super Kings and Lucknow Super Giants :

आयपीएलचा ३९ वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनऊ सुपर जाएंट्समध्ये होत आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होत आहे. सीएसकेच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळाल्याचा परिपूर्ण लाभ घेतला. सीएसकेचा कर्णधार आणि शिवम दुबेच्या फटकेबाजीने चेन्नईच्या संघाने २० षटकात ४ विकेट गमावत २१० धावा केल्या. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय संघाची चिंता वाढवणारा ठरला. सीएसकेच्या फलंदाजांनी लखनऊच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

या सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१० धावा केल्या. सीएसकडून फलंदाजी करताना कर्णधार गायकवाडने सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने अवघ्या २७ चेंडूत ६६ धावा केल्या. शिवमने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ७ शानदार षटकार मारले. याशिवाय मिचेलने ११ आणि जडेजाने १६ धावा केल्या. या सामन्यात धोनीला फक्त एक चेंडू खेळायला मिळाला, ज्यावर धोनीने शानदार चौकार लगावला.

या सामन्यात ऋतुराज गायकवाड एका वेगळ्याच लयीत दिसला. सुरुवातीपासूनच गायकवाडने लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली होती. फलंदाजी करताना गायकवाडने ६० चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान गायकवाडने १२ चौकार आणि ३ शानदार षटकार मारले. सीएसकेसाठी शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड आयपीएल इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. याआधी कोणत्याही CSK कर्णधाराला जमलं नाही, अगदी ही धोनीलाही अशी कामगिरी करता आली नाहीये.

लखनऊची प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

चेन्नईची प्लेइंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT