Catch video
Catch video SAAM TV
क्रीडा | IPL

Viral Video: लागली का पैज? अशी कॅच तुम्ही आयुष्यात पाहिली नसेल! व्हिडिओ पाहूनही बसणार नाही विश्वास

Chandrakant Jagtap

Amazing Catch Video : क्रिकेट सामन्यात खेळाडू काही वेळा अशा कॅच पकडतात ज्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. अशा कॅच पाहून पाहणाऱ्यांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एका भन्नाट कॅचचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्या खेळाडूने ही कॅच कशी पकडली असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टी10 सामन्यात पकडली कॅच

युरोपियन क्रिकेट लीगमध्ये CIYMS आणि Dreux या दोन संघात टी-10 सामना खेळला गेला. या सामन्यात सिम्स संघाने 10 षटकात 6 बाद 125 धावा केल्या. यानंतर ड्रेक्सने 4 चेंडू शिल्लक असताना 7 गडी गमावून 128 धावा करून लक्ष्य गाठले. मोहम्मद राफाने सर्वाधिक 38 धावांचे योगदान दिले. त्याने 12 चेंडूत एक चौकार आणि 5 षटकार ठोकले.

अविश्वसनिय कॅच

याच सामन्यात ड्रेक्स संघाच्या डावातील चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अॅडम केनेडीच्या फुल टॉस बॉलवर अहमद नबीने उत्कृष्ट शॉट खेळला. प्रेक्षकांना वाटले की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि फलंदाजाच्या खात्यात 6 धावा जमा होतील. परंतु जेसन व्हॅन डर मर्वे आणि जेकब मुल्डर सीमारेषेवर उपस्थित होते.

खेळाडूंच्या समयसुचकतेचे कौतुक

या दोघांनी ही कॅच पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. ज्या चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या तो चेंडू सीमारेषेवर पकडून त्यांनी नबीला बाद केले. यावेळी दोघांनी घेतलेल्या परिश्रमाचे आणि त्यांच्या समयसुचकतेचे कौतुक केले जात आहे. (Sports News)

वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ

हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटच्या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये 'आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट टीम कॅच' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला 1.6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT