Indian cricket team captain  
Sports

टीम इंडियाने रिव्यू गमावला, तरीही कर्णधार रोहित शर्माचं केलं कौतुक, कारण...

भारताने दोन सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव करुन सीरिजवर विजयाची मोहोर उमटवली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन टी-२० सामन्यांची सीरिज सुरु आहे. भारताने दोन सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव करुन सीरिजवर विजयाची मोहोर उमटवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Indian cricket team) इंग्लंड विरुद्ध टी-२० सामने खेळत आहे. पंरतु, इंग्लंड विरोधात खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात एका निर्णयामुळं कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) दिग्गज खेळाडूंनी कौतुक केलं आहे. क्रिकेटच्या सामन्यात घेतलेला रिव्यू हा निर्णायक भूमिका बजावत असतो. दुसऱ्या सामन्यातही रिव्यूबाबत चर्चा झाली. रोहितने इंग्लड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात (India-England T-20 Match) एक रिव्यू घेतला, पण तो रिव्यू चुकीचा ठरला. तरीही कमेंटेटर्सने रोहितचं कौतुक केलं. रोहितने सलग १४ सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा विक्रमही केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात रोहित शर्माची जोरदार चर्चा सुरु आहे.

भारताने घेतले दोन रिव्यू

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दोन रिव्यू घेतले. ज्यामध्ये एक रिव्यू घेण्याच निर्णय योग्य होता, तर चुकीच्या निर्णयामुळं भारताने दुसरा रिव्यू गमावला. परंतु, दुसरा रिव्यू हा विशेष ठरला. कारण हा रिव्यू घेताना रोहितने ज्या प्रोसेसचा अवलंब केला, तो निर्णय अगदी योग्य होता. जरी टीम इंडियाने हा रिव्यू गमावला, तरीही रोहितने ज्या पद्धतीने रिव्यू घेतला ते पाहून कमेंटेटर्सही रोहितचे चाहते बनले.

काय झालं नेमकं ?

इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचवं षटक टाकत होता. त्यावेळी एक चेंडू क्रिझवर असणारा इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याच्या पॅडवर लागला. त्यानंतर टीम इंडियाने अपील केली, परंतु अंपायरने नॉट आऊट दिलं. जेव्हा रोहित शर्माने बुमराहकडे पाहिलं, तेव्हा रोहित म्हणाला, चेंडूने उसळी घेतली आहे. त्यामुळे रिव्यू घेणं योग्य ठरणार नाही. पण तरीही रोहितने रिव्यू घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला. असं असतानाही कंमेंटेटर्सने रोहितचं कौतुक केलं. कारण रोहितने ज्या पद्धतीने रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला,ते पद्धत योग्य होती.

...म्हणून रोहित शर्माचं केलं कौतुक

जेव्हा बुमराहने फेकलेला चेंडू हॅरी ब्रूकच्या पॅडवर लागला. तेव्हा रोहितने बुमराहला याबाबत विचारलं. चेंडू उंचीवर आहे, असं बुमराहने रोहितला सांगितलं. यावर बुमराहला रोहितने उत्तर दिलं, तु मला फक्त चेंडूच्या लाईन-लेंथबाबत सांग, चेंडूच्या उंचीविषयी मी स्क्वेअक फिल्डरसोबत चर्चा करेल. कारण, गोलंदाज समोर असताना तो लाईनबाबत योग्य माहिती देऊ शकतो आणि बाजूला असलेला क्षेत्ररक्षक चेंडू स्टम्पच्यावरुन गेला आहे की नाही, याबाबत सांगेन.

त्यावेळी कॉमेंट्री करणारे आणि ग्राम स्वाम आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रोहितचं कौतुक केलं. कारण रिव्यू जरी चुकीचा असला, तहीरी रोहितने ज्या अप्रोचमध्ये रिव्यू घेतला होता, त्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. दरम्यान, भारताने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत १७० धावा कुटल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र १२१ धावांवर नांगी टाकली. भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीमुळं भारताला इंग्लंडचा पराभव करणे शक्य झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 लाखाच्या पगारावर आता 1 रुपया ही टॅक्स नाही, वाचा ही ट्रिक

Instagram: इन्स्टाग्राम युजर्सचे टेन्शन वाढलं, १.७६ कोटी अकाऊंट्सचा डेटा लीक, तुम्हाला 'हा' मेसेज आला तर चुकूनही...

Maharashtra Live News Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

SCROLL FOR NEXT