babar azam saam tv news
क्रीडा

Babar Azam News: बाबर आझमवर फिक्सिंगचे आरोप! मोबदल्यात महागडे गिफ्ट्स मिळाल्याचा दावा; पाहा VIDEO

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही पाकिस्तान संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला या स्पर्धेतील पहिल्याच फेरीतून माघारी परतावं लागलं आहे. या सुमार कामगिरीनंतर बाबर आझमवर फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत. त्याला अमेरिकेकडून पराभूत होण्यासाठी महागडे गिफ्ट्स मिळाले होते. असा आरोप पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार मुबाशिर लुकमानने केले आहेत. हे आरोप करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुबाशिर लुकमाननने बाबर आझमवर मोठे आरोप केले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, अमेरिकेकडून हरण्यासाठी त्याला महागडे गिफ्ट्स दिले होते.

मुबाशिर लुकमान यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये बाबर आझमवर धक्कादायक आरोप केले आहेत.पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील जसातसा विजय मिळवला. या सुमार कामगिरीवरुन मुबाशिर लुकमान यांनी बाबर आझमला टार्गेट केलं आहे.

त्यांनी असा दावा केला आहे की, त्याला ऑडी ई-ट्रॉन कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. ज्यावेळी बाबर आझमला विचारण्यात आलं की, ही कार कोणी दिली? त्यावेळी त्याने ही कार त्याच्या भावाने गिफ्ट केल्याचं सांगितलं. यासह त्याला ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये अपार्टमेंट गिफ्टमध्ये मिळाल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ क्रिक मेट नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुबाशिर लुकमान बाबर आझमवर आरोप करताना दिसून येत आहेत.

पाकिस्तानने या स्पर्धेत सुपरफ्लॉप कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला. अमेरिका विरुद्ध आयर्लंड हा सामना पाकिस्तान संघासाठी सुपर ८ मध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. मात्र हा सामना पावसामुळे धुतला गेला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आणि अमेरिकेचा संघ सुपर ८ साठी पात्र ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT