Murder Case against Shakib Al Hasan 
क्रीडा

Shakib Al Hasan: शाकिबवर असलेल्या हत्येच्या गुन्ह्यासंदर्भात कर्णधार शांतोने सोडलं मौन; म्हणाला, त्याच्यावर अशी केस होणं...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बांगलादेशाच्या टीमचा अनुभवी गोलंदाज शाकिब-अल-हसनवर हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या शाकिबला त्याच्या टीमच्या खेळाडूंकडून समर्थन मिळाल्याचं दिसून येतंय. या महिन्याच्या सुरुवातीला सरकार पाडणाऱ्या दंगलीच्या संदर्भात शाकिबवर कथित हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यासंदर्भात आता या संपूर्ण प्रकरणावर कर्णधार नझमुल हुसेन शांतो याने भाष्य केलं आहे.

नाझमुल शांतोच्या म्हणण्यानुसार, रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याच्या टीमचा पहिला टेस्ट विजय आहे. दरम्यान या सामन्यात ऑलराऊंडर शाकिबने दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही कामगिरी त्या शेकडो लोकांसाठी श्रद्धांजली आहे, ज्यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे.

बांगलादेशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलानादरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं. यावेळी बांगलादेशात अनेक दिवस निदर्शनं करण्यात आली. हा मुद्दा अधिकच चिघळल्यामुळे शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं. त्या 5 ऑगस्ट रोजी भारतात परतल्या आणि त्यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

शांतो पुढे म्हणाला की, 'शाकिब 17 वर्षांपासून बांगलादेशचं नाव मोठं केलं आहे. त्यामुळे शाकिब भाईवर अशी केस होणं हे अनपेक्षित आहे. नव्या बांगलादेशात काहीतरी नवीन बघायचं आहे. मला आशा आहे की, सर्व नाकारात्मक गोष्टी दूर होऊन लवकरच आशेचा किरण दिसून येईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नुकतंच बांगलादेशाच्या क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू शकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांगलादेशी न्यूज वेबसाईट ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, मृत रुबेलचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाकाच्या अडबोर पोलीस स्टेशनमध्ये साकिबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबेल हा कापडाचा कामगार होता. तो आंदोलनादरम्यान सहभागी झाला असून त्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता.

शाकिब अल हसनशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमदवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाकिब हा या प्रकरणातील २८वा आरोपी आहे, तर फिरदौस हा ५५वा आरोपी असल्याचं समोर आलं आहे. इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि इतर १५४ जणांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT