Blind T20 World Cup 2022, Team India/Social Media
Blind T20 World Cup 2022, Team India/Social Media SAAM TV
क्रीडा | IPL

Blind T20 World Cup 2022: टीम इंडियानं रचला इतिहास, बांगलादेशला हरवून जिंकला ब्लाइंड टी २० वर्ल्डकप

Nandkumar Joshi

Blind T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियानं बांगलादेशला अंतिम सामन्यात पराभूत करून ब्लाइंड टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. बेंगळूरूच्या चिन्नास्वामी मैदानात झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने १२० धावांनी विजय मिळवून वर्ल्डकप विजेतेपद पटकावलं.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २७७ धावा केल्या. टीम इंडियानं फक्त दोन गडी गमावून धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ३ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियानं ब्लाइंड टी २० वर्ल्डकप २०२२ जिंकून भारतीय चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.

टीम इंडियानं वर्ल्डकप स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतानं तिसऱ्यांदा ब्लाइंड टी २० वर्ल्डकप स्पर्धा जिंकली आहे. याआधी २०१२ आणि २०१७ मध्येही भारतानं विजेतेपद पटकावलं होतं.

भारताकडून दोघांनी शतके झळकावली

भारताकडून या अंतिम सामन्यात दोघांनी शतके झळकावली. सुनील रमेश याने ६३ चेंडूंत १३६ धावा केल्या. तर कर्णधार अजय रेड्डी याने ५० चेंडूंत १०० धावा केल्या. टीम इंडियानं २० षटकांत २ बाद २७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला फक्त १५७ धावाच करता आल्या.

यंदा भारताकडं ब्लाइंड टी २० वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद होतं. तर पुढची वर्ल्डकप २०२४ ची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिजावरून मोठा वाद झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart Big Saving Days Sale च्या आधीच iPhone 14, iPhone 12 वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

SCROLL FOR NEXT