Cricket News: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बिग बॅश लीगमध्ये तर हद्दच झाली आहे. शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरला अवघ्या 15 धावांत गारद केले. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 35 चेंडू खेळून ऑलआऊट झाला.
सिडनी संघात अॅलेक्स हेल्स, रिली रुसो सारखे मोठे फलंदाज होते, पण असे असूनही संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. बिग बॅश लीगच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2015 मध्ये मेलबर्न रेनेगेड्सचा संघ 57 धावांत गारद झाला होता. (Latest Marathi News)
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 20 पेक्षा कमी धावा करून एखादा संघ बाद झाला आहे. सिडनी थंडरची 15 धावांची धावसंख्या ही पुरुषांच्या T20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी तुर्कीच्या नावावर हा न आवडणारा रेकॉर्ड होता. 2019 मध्ये तुर्की संघ अवघ्या 21 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता हा विक्रम सिडनी थंडरच्या नावावर झाला आहे.सिडनी थंडरने आणखी एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात कमी ओव्हरमध्ये ऑलआऊट होण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर झाला आहे. (Sports News)
सिडनी थंडरला अवघ्या 140 धावांचे लक्ष्य मिळाले पण त्यांच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे ही नामुष्की ओढावली. सलामीवीर अॅलेक्स हेल्स, मॅथ्यू गिल्क्स खातेही उघडू शकले नाहीत. रिली रुसोचे खाते उघडले पण तो 3 धावांवर बाद झाला. कर्णधार जेसन देखील शुन्यावर बाद झाला. अॅलेक्स रॉस, डॅनियल सॅम्स हे तिघेही क्रीझवर आले आणि लेगचे गेले.
संघातील चार फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.सिडनी थंडरच्या खेळाडूकडून सर्वाधिक धावा 4 होत्या, त्याही दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने केल्या.सिडनी थंडरचा एकही फलंदाज 6 चेंडूंपेक्षा जास्त खेळू शकला नाही.
एकीकडे सिडनी थंडरची फलंदाजी खराब असताना दुसरीकडे अॅडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी जादूई कामगिरी केली. मॅथ्यू शॉर्टने पहिली विकेट घेतली पण त्यानंतर हेन्री थॉर्नटन आणि वेस अगर सिडनीच्या संघावर तुटून पडले. थॉर्नटनने 2.5 षटकांत केवळ 3 धावा देऊन 5 विकेट घेतल्या, तर वेस अगरने 6 धावांत 4 विकेट घेतल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.