Ind Vs Ban : भारत मोठा विजय मिळवणार?; गिल-पुजाराची शतके, बांगलादेशसमोर मोठं लक्ष्य

Ind vs Ban, 1st Test Match Highlights : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं शतकांचा दुष्काळ संपवला.
Ind vs Ban, 1st Test Match Highlights/BCCI-Twitter
Ind vs Ban, 1st Test Match Highlights/BCCI-TwitterSAAM TV

Ind vs Ban, 1st Test Match Highlights : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं शतकांचा दुष्काळ संपवला. चटगाव कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पुजारानं दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या. पुजारा नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुल यानं २ बाद २५८ धावांवर डाव घोषित केला.

भारतानं बांगलादेशसमोर अखेरच्या डावात ५१३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पुजारासह शुभमन गिलनंही आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. दुसरीकडे भलंमोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनीही चांगली सुरुवात केली आहे. त्यांनी बिनबाद ४२ धावा केल्या आहेत. (Latest Marathi News)

Ind vs Ban, 1st Test Match Highlights/BCCI-Twitter
Shubman Gill : शुभमन गिल तळपला, ७०० दिवसांनंतर कसोटीत ठोकलं पहिलं शतक

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या १० धावांनी शतकापासून दूर राहिलेल्या चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या डावातही जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं यावेळी आपलं शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे पुजारानं अवघ्या १३० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. कसोटीतलं त्याचं हे सर्वात वेगवान शतक ठरलंय. तिसरे सत्र सुरू झाल्यानंतर तासाभरानंतर पुजारानं धावांचा वेग वाढवला. त्यानं चौकार ठोकून आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर कर्णधार राहुलनं डाव घोषित केलं. (Team India)

गिलचं पहिलं शतक

तिसऱ्या दिवशी बांगलादेशचे उर्वरित दोन विकेट अवघ्या १७ धावांत बाद केले. बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या १५० धावांवर गारद केला. त्यामुळं भारताला पहिल्या डावात २५४ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात कर्णधार राहुल आणि गिल यानं पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. खालेद अहमदनं राहुलला धावबाद केले. गिलने पुजाराच्या मदतीने धावगती राखली. दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचली.

Ind vs Ban, 1st Test Match Highlights/BCCI-Twitter
Kuldeep Yadav : 'चायनामॅन' कुलदीप यादवची जादू चालली, फिरकी गोलंदाजीपुढे बांग्लादेशच्या फलंदाजांनी टाकली नांगी

५२ डाव, ४ वर्षांची प्रतीक्षा संपली

शतक झळकावल्यानंतर गिलने धावांची गती वाढवण्याच्या इराद्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, मेहदी हसननं त्याची विकेट घेतली. त्यावेळी भारताची आघाडी ४३० धावांपर्यंत पोहोचली होती. विराट कोहलीनं पुजाराला साथ दिली. पुजाराला तो स्ट्राइक देत होता. डाव घोषित करण्यासाठी भारतानं पुजाराच्या शतकाची वाट बघितली. पुजारानेही विश्वास सार्थ ठरवत आपलं शतक पूर्ण करून चार वर्षांची प्रतीक्षा संपवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com