Ashish Shelar News, Maharashtra government News, CM Eknath Shinde News saam tv
Sports

क्रीडामंत्रिपदी आशिष शेलार ? 'त्या' ट्विटनंतर हाेताेय शेलारांवर अभिनंदनाचा वर्षाव

साेमवारी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सरकारचे बहुमत सिद्ध केले.

Siddharth Latkar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (bjp) नेते आशिष शेलार (ashish shelar) यांची एकनाथ शिंदे (eknath shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री (sports minister) म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे बहुमत सिद्ध केले. त्यानंतर काेणा काेणाला मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. (Ashish Shelar latest marathi news)

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रिडा प्राधिकरणाने "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. देशाच्या टारगेट ऑलम्पिक पोडियम (TOPS) योजनेसाठी काम करणारी "लक्ष्य ऑलम्पिक मिशन" ही 16 सदस्यीय समिती असून त्यामध्ये आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत स्वत: शेलार यांनी ट्विट करुन जनतेस माहिती दिली आहे. दरम्यान शेलार यांची निवड झाल्याने राज्यातील मंत्रीमंडळात त्यांना क्रीडा क्षेत्रासाठी याेगदान द्यावे लागेल अशी चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण तसेच सुनील केदार यांच्याकडे क्रीडा खाते साेपविण्यात आले हाेते. आता शिंदे- फडणवीस सरकार ही दाेन खाती वेगळी करणार की एकच ठेवणार याचीही चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT