Devdutt Padikkal saam tv
क्रीडा

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

IND vs AUS 1st Test : पहिल्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल झाला असून यावेळी एका महान फलंदाजाचा प्रवेश झाला आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाहीये.

Surabhi Jagdish

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टॉस जिंकला असून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल झाला असून यावेळी एका महान फलंदाजाचा प्रवेश झाला आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाहीये.

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या ठिकाणी टीम इंडियाला पाच सामन्यांची टेस्च सिरीज खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉईंट्स टेबलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासाठी ही टेस्ट सिरीज देखील खूप महत्त्वाची आहे. पहिला सामना हा पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जातोय.

या खेळाडूचा टीममध्ये अचानक समावेश

वैयक्तिक कारणामुळे रोहित शर्मा या सामन्यात सहभागी होणार नाहीये. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय. बीसीसीआयने पहिल्या टेस्टसाठी डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलचा टीममध्ये समावेश केला आहे. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पर्थ टेस्टसाठी कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११?

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

SCROLL FOR NEXT