rohit sharma Saam Tv
Sports

IPL जिंकण्यामागे मोठं कारण...; MI चं नाव घेत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला, मी आता थांबणार नाही...!

Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकपनंतर आता टीम इंडियाचं लक्ष चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपकडे आहे. आगामी वर्षामध्ये या दोन्ही स्पर्धा होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या टीम इंडियाची कोणतीही सीरीज सुरु नसून खेळाडू देखील आराम करतायत. अशातच पुन्हा एकदा रोहित शर्माच्या जोरदार चर्चा सुरु आहे.नुकतंच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपच्या विजयाचं श्रेय तीन आधारस्तंभांना दिलं. हे तीन आधारस्तंभ म्हणजे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), मुख्य सिलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah). दरम्यान रोहित शर्माने आगामी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी आपण तयार असल्याचंही म्हटलं आहे.

29 जूनला रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. हा वर्ल्डकप जिंकत भारताने तब्बल 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकत दुष्काळ संपवला. नुकतंच रोहित शर्माला CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं. हा अवॉर्ड मिळाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

अवॉर्ड मिळाल्यानंतर या कार्यक्रमात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "मी आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकण्यामागे एक कारण आहे. मी आता थांबणार नाही, कारण एकदा का तुम्हाला सामने जिंकण्याची, कप जिंकण्याची चव चाखायला मिळाली की तुम्हाला थांबायचं नाहीये. आम्ही एक टीम म्हणून पुढे जात राहणार आहोत. भविष्यात आणखी चांगल्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, आगामी काळात टीम इंडियाला महत्त्वाचे दौरे खेळायचे आहेत. हे देखील खूप आव्हानात्मक असणार आहे. एकदा आपण काहीतरी साध्य केलं की आपण नेहमी अधिक साध्य करण्यासाठी उत्सुक असतो.

मला खात्री आहे की, माझे टीममधील इतर सहकारी देखील असाच विचार करत असतील. मी गेल्या दोन वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये जे पाहिलं आहे, त्यांच्यात नवा उत्साह आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. दरम्यान रोहितने या विधानासह स्पष्ट केलंय की, त्याचं पुढील लक्ष्य जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी आहे.

रोहितने १७ वर्षांचा दुष्काळ संपवला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारताने अमेरिका आणि वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या T20 वर्ल्डकप 2024 चे विजेतेपद पटकावलं होत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं आणि 2007 नंतर दुसऱ्यांदा T20 वर्ल्डकप जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT