गेल्या काही दिवसांपासून दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे. बुधवारी(१४ ऑगस्ट) बीसीसीआयच्या निवड समितीने दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यांसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा हे स्टार खेळाडू खेळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या खेळाडूंना या स्पर्धेसाठी स्थान देण्यात आलेलं नाही.
संघ A: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
संघ B: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित आवस्थी, एन जगदीशन (विकेटकीपर).
संघ C: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सूथर, उमरान मलिक, वैषाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वॉरियर.
संघ D: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व ताइडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकर, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार.
या स्पर्धेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन यांना संधी मिळणार अशी चर्चा सुरु होती. मात्र या संघात त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोघेही थेट बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येऊ शकतात. तर मोहम्मद शमीला देखील या स्पर्धेसाठी स्थान देण्यात आलेलं नाही.
या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना वगळण्यात आलं आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघात कमबॅक करण्याची उत्तम संधी होती. मात्र आता या दोन्ही खेळाडूंचे भारतीय संघात कमबॅक करण्याचे स्थान बंद झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.