jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह IND vs BAN मालिकेला मुकणार; मोठं कारण आलं समोर

Jasprit Bumrah,IND vs BAN Test Series: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बांगालदेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये. काय आहे कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs Bangladesh Test Series: भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनल आणि टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली होती. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत एकही सामना खेळण्यासाठी मैदानात आलेला नाही.

वर्ल्डकपनंतर भारतीय संघाने श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळली आहे. दरम्यान या मालिकांमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला दिर्घकाळ विश्रांती दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराहला विश्रांती

श्रीलंका दौऱ्यावरुन परतल्यानंतर भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही खेळाडूंमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. ४३ दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय खेळाडू कसोटी आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

दरम्यान इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. ही मालिका भारतात रंगणार आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

शमीचं होणार कमबॅक

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. मात्र स्पर्धेनंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

तेव्हापासून तो पुन्हा एकदा फिट होण्याच्या प्रयत्नात आहे. काही दिवसांपूर्वी तो नेट्समध्ये सराव करताना दिसून आला होता. त्यामुळे तो कमबॅक करणार असं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT