rohit sharma and hardik pandya  google
Sports

Rohit Sharma: हार्दिक, सूर्या नव्हे तर रोहितच होणार कॅप्टन? मोठी अपडेट आली समोर

IPL 2024, Hardik Pandya: गेली २ वर्षे गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटी मोजत ट्रेड केलं आहे. मात्र हे हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Captaincy:

आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याची निवड केली गेली आहे. गेली १० वर्ष रोहित शर्मा या संघांच नेतृत्व करताना दिसून आला होता.हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या फॅन्समध्ये नाराजी पाहायला मिळाली होती.

गेली २ वर्षे गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटी मोजत ट्रेड केलं आहे. मात्र हे हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याबाबत मोठी अपडेट आली आहे. ज्यामुळे मुंबईच्या टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. माध्यमातील वृत्त्तानुसार, दुखापतीतून पूर्णपणे सावरु न शकलेला हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. ही स्पर्धा होण्यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाहीये .

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'हार्दिकच्या फिटनेसबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही. आयपीएल सुरु होण्यापू्र्वी तो येणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे.'

रोहित पुन्हा होणार कर्णधार?

हार्दिक पंड्या टी-२० मालिका न खेळणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. (Latest sports updates)

त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, गेल्या काही महिन्यांपासून टी-२० क्रिकेटपासून दुर असलेला रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध कमबॅक करु शकतो.

जर रोहित संघात आला तर, तो टी-२० संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. असे झाल्यास क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT