Big blow for punjab kings ahead of rr vs pbks kagiso rabada ruled out of ipl 2024 amd2000 saam tv news
Sports

RR vs PBKS: राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Kagiso Rabada Ruled Out Of IPL: राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील स्टार खेळाडू कगिसो रबाडा दुखापतग्रस्त असल्याने मायदेशी परतला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, त्याच्या लोवर लिंबच्या सॉफ्ट टिश्यूमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धा सोडून मायदेशी परतावं लागलं आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा तोंडावर असताना तो दुखापतग्रस्त होणं, ही दक्षिण आफ्रिका संघासाठी चिंतेची बाब आहे. मात्र तो या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कगिसो रबाडाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर या हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून ११ सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरला. यादरम्यान त्याने ८.८५ च्या इकॉनॉमीने ११ गडी बाद केले आहेत. कगिसो रबाडा स्पर्धेतून बाहेर पडण्याने पंजाब किंग्ज संघाला फारसा फरक पडणार नाही. कारण पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पंजाब किंग्ज संघाची या हंगामातील कामगिरी

या संघाची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने ही जबाबदारी सॅम करनकडे सोपवण्यात आली. मुंबई इंडियन्सनंतर पंजाब किंग्ज हा प्लऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला होता. या संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाला १२ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. तर ८ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज त्र्यंबकेश्वरमध्ये सभा

२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाची बातमी! बेसिक सॅलरी ₹१८००० वरुन ४४,२८० होण्याची शक्यता

Heavy Rain Alert : राज्यात थंडी ओसरली, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, वाचा हवामान विभागाचा इशारा

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

SCROLL FOR NEXT