pakistan cricket team twitter
Sports

Pakistan Cricket Team: मोहम्मद रिझवान कर्णधार बनताच पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप; दिग्गजाने सोडली संघाची साथ

Gary Kirsten Resigned From Pakistan Cricket Team: मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने पदभार स्विकारताच दिग्गज खेळाडूने संघाची साथ सोडली आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तानने नुकताच मायदेशात खेळताना इंग्लंडला कसोटी मालिकेत २-१ ने धूळ चारली आहे. ही मालिका झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वनडे आणि टी -२० संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

त्यामुळे ही जबाबदारी आता जेसन गिलस्पीकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी गिलस्पी हा केवळ कसोटी संघाची जबाबदारी पार पाडत होता. मात्र आता त्याच्याकडे तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कर्णधारही बदलला

काही दिवसांपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर निवड समिती बदलण्यात आली होती. नव्या निवड समितीने तडकाफडकी निर्णय घेत, बाबर आझम आणि संघातील स्टार खेळाडूंना बाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय यशस्वी ठरला आणि पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकली. आता मोहम्मद रिझवानकडे वनडे आणि टी -२० संघाची जबाबदारी सोपवली आहे.

असा राहिला गॅरी कर्स्टन यांचा कार्यकाळ

गॅरी कर्स्टन हे गुजरात टायटन्स संघाचे मेंटॉर होते. ही भूमिका बजावल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी -२० संघाचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचा संघ सुपर साखळी फेरीतून बाहेर पडला.

गॅरी कर्स्टन यांच्याकडे आयसीसीची स्पर्धा जिंकण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तर येत्या काही महिन्यांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी गॅरी कर्स्टन यांनी हे पद सोडणं ही पाकिस्तानसाठी चिंता वाढवणारं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export: बांगलादेशात पाकिस्तानाचा कांदा; भारतीय शेतकऱ्यांचा वांदा,केंद्र सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT