हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातने या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला. यासह मुंबईने सलग १४ व्या हंगामात स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. दरम्यान मुंबईचा पुढील सामना २७ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला होता. सूर्यकुमारला यादवला NCA कडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. आता दुसऱ्या सामन्यापूर्वीही सूर्यकुमार यादवला NCA कडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यामुळे तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.
माध्यमातील वृत्तानुसार, अनफिट असलेल्या सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यासाठीही फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता ज्यात असं म्हटलं गेलं होतं की, सूर्यकुमार यादवची दुसरी फिटनेस चाचणी २१ मार्च रोजी घेण्यात आली होती. दोनदा फिटनेस चाचणी प्रक्रियेतून गेल्यानंतरही त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. येत्या जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघातील हुकमी एक्का असणार आहे. त्यामुळे बीसीसीआय घाईघाईने निर्णय घेणार नाही. (Cricket news in marathi)
सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली गेली होती. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला मैदन सोडावं लागलं होतं. तेव्हापासून तो मैदानापासुन दूर आहे. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो फिट आहे. मात्र तो फिटनेस चाचणी पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.