Zaheer Khan, Mumbai Indians: आयपीएल २०२५ स्पर्धेला लिलाव होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात अनेक मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. या लिलावात रिटेन केलेल्या खेळाडूंची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे.
यासह आणखी काही नियम बदलणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या मेगा लिलावापूर्वी अनेक स्टार खेळाडू आपल्या संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. ज्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावाचा देखील समावेश आहे.
तो संघात कायम राहणार? की संघाची साथ सोडणार? हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान रोहित शर्माआधी मुंबई इंडियन्स संघातील दिग्गज खेळाडू संघाला रामराम ठोकणार आहे.
माध्यमातील वृत्तात असा दावा केला जात आहे की, मुंबई इंडियन्स संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट जहीर खान आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार आहे. जहीर खान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.
काही वर्ष त्याने संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याला डायरेक्टर ऑफ क्रिकेट हे पद देण्यात आलं होतं. मात्र आता तो या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासह तो लखनऊ सुपर जायंट्स संघात एन्ट्री मारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात जहीर खानचा मोलाचा वाटा राहिला आहे. मात्र आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजयाचे धडे देताना दिसून येऊ शकतो. त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघात मेंटॉरची भूमिका दिली जाऊ शकते.
यापूर्वी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर या संघाचा मेंटॉर होता. मात्र गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे तो इतर कुठल्याही संघाला प्रशिक्षण देऊ शकत नाही.
जस्टिन लेंगर सध्या या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. यासह ॲडम वोग्ज आणि लांस क्लूजनर देखील या संघाचा भाग आहे. आता जहीर खान या संघासोबत जोडला जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.