IPL 2026 Kolkata Knight Riders saam tv
Sports

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

IPL 2026 Kolkata Knight Riders: आयपीएल सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आयपीएल सिझनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आता काही दिवसातच क्रिकेटची सर्वात मोठी लीग इंडियन प्रिमीयर लीगला सुरुवात होणार आहे. मात्र ही लीग सुरु होण्यापूर्वीच तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षित राणा आगामी आयपीएल सिझनमधून बाहेर पडला आहे.

फ्रँचायझी किंवा बीसीसीआयने मात्र याची अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. हर्षित टीममध्ये नसण्याने कोलकाताची गोलंदाजी लाइनअप अडचणीत येऊ शकते. शिवाय केकेआरला आधीच मुस्तफिजूर रहमानच्या रूपाने एका धक्का बसला आहे.

टी-२० वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान हर्षित राणाला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. २४ वर्षीय या खेळाडूवर ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत शस्त्रक्रिया झाली होती. मात्र अजून तो दुखापतीतून सावरू शकलेला नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी हर्षित वेळेत बरा होऊ शकणार नाही असं म्हटलं जातंय.

२०२४ च्या सिझनमध्ये कोलकात्याच्या टीमने आयपीएल जिंकली होती. त्या विजयामत हर्षितने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या सिझनमध्ये त्याने १९ विकेट्स घेतले होते. या कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्येही नियमितपणे संधी मिळू लागली. २०२५ च्या सिझनपूर्वी फ्रँचायझीने त्याला ४ कोटींमध्ये रिटेन केलं. त्याने १३ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या.

हर्षितच्या जागी कोण खेळणार?

दरम्यान टीमने अजूनही या ऑलराऊंडर खेळाडूच्या जागी कोणाला खेळवण्याचा निर्णय घेतलाय हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र यावेळी ब्लेसिंग मुजारबानीला संधी मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. ब्लेसिंग हा वेस्ट इंडिजचा खेळाडू असून त्याने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती.

शुक्रवारी फ्रँचायझीने झिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीला त्यांच्या टीममध्ये घेतलंय. ६ फूट ८ इंचाच्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने टी-२० मध्ये चांगली खेळी केली आहे. मुजारबानीने ८० हून अधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९० हून अधिक विकेट घेतल्यात. मुझारबानी १७ मार्चपर्यंत कोलकाताला पोहोचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT