indian womens cricket team twitter
क्रीडा

Womens T20 WC 2024 आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! संघातील 4 प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त

Ankush Dhavre

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी १६ सदस्यीय भारतीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. दरम्यान ही स्पर्धा तोंडावर असताना, भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील १, २ नव्हे, तर ४ खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

भारतीय महिला संघातील प्रमुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज सरावादरम्यान बोटाला टेप लावून सराव करताना दिसून आली. तर श्रेयंका पाटीलच्या बोटाला फ्रॅक्चर आहे. हे दोघेही फिट नसल्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.

ही स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

पूजा वस्त्राकर ही भारतीय संघाची प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. ती फलंदाजीत आणि गोलंदाजीत बहुमूल्य योगदान देते. पूजा खांद्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळ ती इंजेक्शन घेऊन मैदानात आली होती. पूजासह अरुंधती रेड्डी देखील खांद्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. हे स्टार खेळाडू वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी फिट होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष/यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.

ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर आणि साइमा ठाकूर.

नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: राघवी बिष्ट आणि प्रिया मिश्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांचा भाजपच्या कार्यकर्ता संवाद, बैठकीला नेत्यांची उपस्थिती

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

Diabetes Symptoms : डायबिटीजमुळे आंधळे व्हाल? धूम्रपान, पथ्य न पाळणाऱ्यांना अधिक धोका?

Akshay Shinde Encounter : बदलापूरचा अर्धवट बदला? चाईल्ड पोर्नोग्राफीचं रॅकेट चालवणारा संस्थाचालक मोकाट?

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन तापलं! बीडहून जालना, संभाजीनगरला जाणाऱ्या बस सेवा बंद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT