england cricket team yandex
क्रीडा

Moeen Ali Retirement: इंग्लंडला मोठा धक्का! दिग्गज खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Ankush Dhavre

इंग्लंडचा स्टार खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केल्यानंतर मोईन अलीने हा निर्णय घेतला आहे. त्याने खराब फिटनेस आणि वाढत्या वयामुळे हा निर्णय घेतला आहे. कुठल्यातरी युवा खेळाडूने ही जागा भरुन काढावी असं, मोईन अलीचं (Moeen Ali) मत आहे.

मोईन अलीचा क्रिकेटला रामराम

इंग्लंडचा माजी खेळाडू नासिर हुसैनसोबत डेली मेलवर बोलताना त्याने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. निवृत्ती घेत असताना मोईन अली म्हणाला की, 'इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होते. आता मला वाटतं की, ही जागा कुठल्यातरी युवा खेळाडूने भरुन काढावी.' तो क्रिकेटसाठी पूर्णपणे फिट नसल्याने त्याने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

मोईन अली म्हणाला की, 'मी इंग्लंडसाठी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करु शकलो असतो, पण मी असं करणार नाही. कारण निवृत्तीनंतरही मी इंग्लंडसाठी खेळू शकतो. पण मला माहित आहे, संघाच्या भविष्यासाठी काय हिताचं आहे. त्यामुळे मी संघाच्या हितासाठी निर्णय घेत आहे.'

अशी राहिली कारकिर्द

मोईन अलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ६८ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला २८.१ च्या सरासरीने ३०९४ धावा करता आल्या. कसोटीत त्याच्या नावे ५ शतक आणि १५ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे.

तर १३८ वनडे सामन्यांमध्ये त्याने २३५५ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ३ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १२२९ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यानत त्याने ७ अर्धशतकं झळकावली आहेत. गोलंदाजी करताना त्याने वनडेत १११, कसोटीत २०४ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Tirupati Balaji : बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी, धक्कादायक दावा

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT