ENG vs AUS 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ४९ धावांनी विजय मिळवला. यासह ही मालिका २-२ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे.
हा सामना इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. स्टुअर्ट ब्रॉडसह मोईन अलीने देखील कसोटी क्रिकेटला राम राम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने अॅशेस मालिकेतील पाचवा सामना सुरू असताना निवृत्तीची घोषणा केली होती. तर मोईन अली साठी देखील हा सामना शेवटचा कसोटी सामना ठरला आहे. मोईन अलीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला राम राम केले होते.
मात्र बेन स्टोक्सने विनंती केल्यामुळे त्याने अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात कमबॅक केले होते. आता अॅशेस झाल्यानंतर त्याने दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटमधुन निवृ्त्ती घेतली आहे.
आता पुन्हा येणार नाही.. .
अॅशेस मालिकेतील पाचवा सामना झाल्यानंतर मोईन अली म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करून छान वाटलं. जेव्हा बेन स्टोक्सने मला अॅशेस खेळण्यासाठी मेसेज केला त्यावेळी मी आश्चर्यचकीत झालो होतो. जॅक लिच दुखापतग्रस्त आहे हे मला माहित नव्हतं. मी कमबॅक करून खेळण्याचा आनंद घेतला. मला माहित होतं की, मानसिकरित्या हे माझ्यासाठी कठीण असेल. परंतु हे देखील माहित होते की शारीरिकदृष्ट्या हे अधिक कठीण असेल. ही एक जबरदस्त मालिका होती. ही मालिका विसरू शकणार नाही.' (Latest sports updates)
स्टोक्सचे मेसेज डिलीट करणार...
याबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, 'आता मी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणार नाही. जर मला स्टोक्सने पून्हा मेसेज केला तर तो मी तो डिलीट करेल.' मोईन अलीने शेवटच्या इंनिंगमध्ये २३ षटक गोलंदाजी करत ७६ धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले. आपल्या कसोटी कारकिर्दीतील ६७ सामन्यांमध्ये ज्यात त्याने ३०३१ धावा केल्या तर गोलंदाजी करताना ६७ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.