इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. टी-२० मालिकेतून बाहेर पडलेला जोस बटलर वनडे मालिकेतूनही बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी हॅरी ब्रुककडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर द हंड्रेड लीग स्पर्धेत सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीतून तो अजूनही पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. आता तो वनडे मालिकेतही खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्याऐवजी इंग्लंडच्या वनडे संघाची जबाबदारी हॅरी ब्रुककडे सोपवण्यात आली आहे.
जोस बटलर संघाबाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी विस्फोटक अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देण्यात आलं आहे. बटलरची रिप्लेसमेंट म्हणून लियाम लिविंगस्टनचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्यात तिसऱ्या टी-२० सामन्यात लियाम लिविंगस्टनने शानदार खेळी केली होती. त्याने विस्फोटक फलंदाजी करत ८७ धावा चोपल्या होत्या. या शानदार खेळीच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
जोस बटलरबद्दल बोलायचं झालं, तर तो टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला इंग्लंड संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर लियाम लिविंगस्टनबद्दल बोलायचं झालं, तर तो डिसेंबर २०२३ मध्ये इंग्लंडसाठी शेवटचा वनडे सामना खेळताना दिसून आला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.