david malan twitter
Sports

David Malan Retirement: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम! टी-20 क्रिकेटमध्ये होता नंबर 1 फलंदाज

David Malan Announced Retirement From International Cricket: इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडसाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजाने आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला होता.

दरम्यान वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही महिन्यांपासून त्याला इंग्लंड संघात कमबॅक करण्याची संधी मिळत नव्हती. अखेर त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

डेव्हिड मलानला भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात जागा मिळाली होती. मात्र त्यानंतर त्याला संघात कमबॅक करण्याची संधी मिळालेली नाही. टी-२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. मात्र संधी मिळत नसल्याने त्याला निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १८०० हून अधिक धावा करण्याची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत त्याने इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र त्याला या स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेत त्याला अवघ्या ५६ धावा करता आल्या होत्या.

अशी राहिलीये कारकिर्द

डेव्हिड मलानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला इंग्लंड संघासाठी २२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २७.५ च्या सरासरीने १०७४ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ९ अर्धशतकं झळकावली. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याला इंग्लंडसाठी ३० सामने खेळण्याची संधी मिळाली.

यादरम्यान त्याने ३६.४ च्या सरासरीने १४५० धावा केल्या. त्याला ६ शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावण्यात यश आलं. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ६२ सामन्यांमध्ये ३६.४ च्या सरासरीने १८९२ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि १६ अर्धशतकं झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT