Big blow for csk matheesha pathirana may miss few matches of ipl 2024 due to injury  saam tv news
Sports

IPL 2024, CSK: RCB विरुद्धच्या सामन्याच्या एक दिवसापूर्वी CSK ला मोठा धक्का! धोनीचा लाडका गोलंदाज दुखापतग्रस्त

Chennai Super Kings: आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Matheesha Pathirana Injury:

आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील गोलंदाज मथिशा पथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो पुढे गोलंदाजी करु शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातूनही पार पडला होता.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पथिराना श्रीलंका क्रिकेटच्या फिजिओसोबत रिहॅब करतोय. तो पूर्णपणे फिट नसल्याने त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डकडून खेळण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. श्रीलंका क्रिकेटकडून अनुमती मिळताच तो संघासोबत जोडला जाईल. आगामी हंमाम सुरु होण्यापूर्वी सीएसकेला मोठे धक्के बसले आहेत. कारण संघातील प्रमुख फलंदाज डेवोन कॉनव्हे दुखापतग्रस्त आहे. आता पथिराना देखील दुखापतग्रस्त आहे. हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी दुहेरी धक्का आहे. (Cricket news in marathi)

मथिशा पथिरानाने गेल्या हंगामात संघासाठी शानदार कामगिरी केली होती. तो डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. गेल्या हंगामातील १४ सामन्यांमध्ये त्याने २१ गडी बाद केले होते. मथिशा पथिरानाच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

या स्पर्धेसाठी असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ:

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सॅंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT