Big blow for csk after defeat against lsg chennai super kings out of top 4 in points table know the latest standings amd2000 twitter
Sports

IPL Points Table: लखनऊविरुद्धच्या पराभवानं CSK ला मोठा धक्का! सामन्यानंतर समोर आली मोठी बातमी

IPL 2024 Latest Points Table Update After CSK vs LSG Match: लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊने या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ या हंगामात चांगली कामगिरी करतोय. मात्र लखनऊविरुद्ध खेळताना या संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत टॉप ४ मध्ये होता. मात्र पराभवानंतर हा संघ टॉप ४ मधून बाहेर पडला आहे. चेन्नईने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ४ सामने जिंकता आले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

टॉप ४ मध्ये या संघांचा समावेश..

या हंगामात बुलेट स्पीडच्या वेगाने पुढे जात असलेला राजस्थान रॉयल्सचा या यादीत अव्वल स्थानी आहे. राजस्थानने आतापर्यंत ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्रत्येकी १०-१० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे.

आतापर्यंत चौथ्या स्थानी असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरला आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत ४-४ सामने जिंकले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ आठव्या स्थानी आहे. तर ४ गुणांसह पंजाबचा संघ नवव्या आणि अवघ्या २ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT