australia saam tv
Sports

IND vs AUS: सेमीफायनलआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर

Matthew Short Ruled Out: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सामना बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारताचा संघ दुबईतच आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील दुबईत दाखल झाला आहे. दरम्यान दुबईत पोहोचताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. शॉर्टला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सेमीफायनलचा सामना खेळताना दिसून येणार नाही. त्याच्या जागी युवा खेळाडू कुपर कोनोलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. कुपरबद्दल बोलायचं झालं, तर हा खेळाडू देखील फिरकी गोलंदाजीत माहीर आहे.

दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ग्रुप बी मधील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला होता. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावं लागलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने याबाबत अपडेट दिली आहे. तो म्हणाला, ' आम्हाला वाटलं होतं की, तो सामन्यादरम्यान मिळालेल्या ब्रेकमध्ये तो पूर्णपणे फिट होईल. मात्र असं काहीच झालेलं नाही.'

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली होती. या सामन्यात मॅथ्यू शॉर्ट ऑस्ट्रेलियाकडून चमकला होता. त्याने ६६ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १५ चेंडूंचा सामना करत २० धावांची खेळी केली होती. त्याची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने २ सामन्यांमध्ये ८३ धावा चोपल्या.

भारत- ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये भिडणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना मंगळवारी (४ मार्च) दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT